वन महोत्सव
दि. १, जुलै:- महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्रात वनक्षेत्र वाढविण्यासाठी, दोन करोड रोपटे १ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्रभर लावण्याचा संकल्प केला आहे. या संबंधात, महाराष्ट्र शासनाने, सर्व शासकीय संस्थांना आदेश दिला आहे की १ जुलै २०१६ रोजी सर्वांनी झाडे लावून शासनास हे उद्देश्य गाठण्यस मदत करावी. सद्ध्या वने व वन्यपशू अती वेगाने कमी होत आहेत. हे आपल्या अस्तित्वास अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा प्रत्येकाने यात योगदान करणे अनिवार्य आहे.
आम्ही कृषी प्रधान असल्याने या प्रकल्पाची सुरूवात आधीच केली आहे. सर्व प्रादेशीक कार्यालये, उत्पादन एकके, गोदाम या सर्वांना जास्तीत जास्त झाडे लावण्याविषयी सुचना देण्यात आल्या आहेत. प्रधान कार्यालयात आज शंभर झाडे लावण्यात आली. व्यवस्थापकीय संचालक यांनी नारळ फोडून व झाडे लावून उद्घाटन केले. त्यानंतर इतर सर्वांनी झाडे लावली.