मुख्य विषयाकडे जा
स्क्रीन वाचण्याची सुगमता
स्थळ नकाशा
अभ्यागत
17044737
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत, कृषी विभाग
मातीतून मनांतर्गताची चळवळ . . .
सी. आय. एन.: यू05000एमएच1965एसजीसी013380
अधिकृत संकेतस्थळ!
स्थापना: १५-डिसेंबर-१९६५
महाराष्ट्र शासन, भारत
मुखपृष्ठ
विभाग
खते
किटक नाशके
कृषी अभिया॑त्रिकी
पशूखाद्ये
खाद्य प्रक्रिया (नोगा)
प्रकल्प
फूड पार्क
योजना
केन्द्रीय खाद्य प्रक्रिया योजना
राज्य खाद्य प्रक्रिया योजना
निविदा
खते
किटक नाशके
कृषी अभिया॑त्रिकी
पशूखाद्ये
खाद्य प्रक्रिया (नोगा)
इतर
नागरीक सेवा
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाचे ठराव
गुंतवणूकदार
आलेख निवेदन पत्र
भाग धारक
आमच्याबद्दल
परिचय
लक्ष्य व उद्दिष्टे
संचालक मंडळ
संघटन रचना
आर्थिक तपशील
संपर्क साधा
स्थळ
करिअर
अभिप्राय
छायाचित्र
सुचना
डिलर
कर्मचारी
अन्य
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाबद्दल
श्री. अब्दुल सत्तार
अध्यक्ष, म.कृ.उ.वि. महामंडळ
तथा
कृषी मंत्री
महाराष्ट्र सरकार, भारत
अध्यक्षांचा संदेश
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत (म. कृ. उ. वि. म.) ची स्थापना सन १९६५ साली कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणास यांत्रीक प्रक्रियेतून चालना देण्यासाठी झाली. ह्या संघटनेची स्थापना, कंपनी अधिनियम १९५६ खाली नोंदवून, करण्यात आली. आपल्या स्थापनेपासूनच, ती शेतकरी बांधवांना, शेतीमध्ये उच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी, सक्षम बनवीत आहे. कंपनीचे उद्दीष्ट आहे की, महाराष्ट्रातील शेतक-यांना उच्च प्रतीची खते, किटकनाशके, कृषी अभियांत्रिकी अवजारे आणि पशुखाद्य, आवश्यक प्रमाणात, वेळेवर, आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे. कंपनी विवीध प्रमाणात दाणेयुक्त मिश्रीत खत (एनपीके) तयार करण्यामध्ये गुंतलेली आहे. खत कारखाने पाचोरा (जळगाव), जालना, नांदेड, वर्धा, कोल्हापूर आणि रसायनी (रायगड) येथे स्थित आहेत. ही आपल्या सहाय्यक कंपनीमार्फत [महाराष्ट्र किटकनाशके मर्यादीत (M. I. L.)], किटकनाशकांची रचना करते. या सहाय्यक कंपनीचे कारखाने अकोला आणि लोटे परशुराम (जिल्हा रत्नागिरी ) येथे आहेत. आपली खते आणि किटकनाशके 'कृषी उद्योग' (K. U.) या ब्रँडच्या अंतर्गत विकण्याव्यतिरिक्त कंपनी आपल्या १५०० वितरकांचा उपयोग इतर नामवंत कंपन्यांची पुरक उत्पादने विकण्यासाठी देखील करते. कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा चिंचवड (पुणे) येथे आहे. येथे कृषीव्हेटर (ट्रॅक्टरने चालविल्या जाणारे अवजार) तयार केल्या जाते. कंपनीकडे पशुखाद्य तयार करणारा कारखाना चिंचवड (पुणे) येथे आहे. हे विविध संयोगांचे पौष्टिक पशुखाद्य तयार करून विकतात आणि यांच्यात विशिष्ट गरजेनुसार खाद्यांमध्ये बदल करण्याची क्षमता देखील आहे. कंपनीकडे नागपूर येथे एक कारखाना आहे ज्यात विविध फळांचा रस, स्क्वेश, सिरप, जाम, केचप, इत्यादी तयार केल्या जातात व नोगा या अत्यंत लोकप्रिय ब्रँडखाली विकल्या जातात. नोगा हा 'नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन' यापासून तयार झालेला शब्द आहे. 'नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन' हे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या ताब्यात १९७२ मध्ये दिले. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर १२ प्रादेशीक कार्यालये रत्नागिरी, कोल्हापूर, नाशीक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे स्थित आहेत. ठाणे व मुम्बई जिल्ह्यासाठी ठाणे सहाय्यक प्रादेशीक कार्यालय मुख्य कार्यालयात स्थित आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे ही राज्य नोडल एजन्सी म्हणून देखील नियुक्त केली गेली आहे. ही राज्य नोडल एजन्सीच्या भुमिकेत, विवीध योजनांतर्गत उद्योजकांच्या प्रस्तावांची छाननी करून भारत सरकारला योग्य ते प्रस्ताव पाठवते. ही उद्योजकांना देखील प्रकल्प तयार करण्यास व क्षेत्र निवडण्यास मदत करते. तसेच नागपूर जवळ बुटीबोरी येथे फूड पार्क देखील विकसीत केले आहे. याव्दारे लहान ते मध्यम फूड प्रोसेसिंग युनिट्ससाठी सामान्य पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिल्या जाते. कंपनी मुंबईत फुलांचे लिलाव केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे.
श्री. गणेश पाटील
भा. प्र. से.
व्यवस्थापकीय संचालक
व्यवस्थापकीय संचालकांचा संदेश
निविदा
बातम्या व घडामोडी
Division Id
File
File Ext
शिर्षक
नवीन?
Select
नोगा: पिण्याचे पाणी
बायोकॅप्सूल तंत्रज्ञान
झेंडावंदन
वन महोत्सव
ई-निविदा
राष्ट्रीय माहिती केंद्र
निविदाकारांची मार्गदर्शिका
मदत कक्ष
२४ x ७ निःशुल्क दूर ध्वनी क्र. १८००-३०७०-२२३२. भ्रमण ध्वनी क्र. ९१-७८७८० ०७९७२ आणि ९१-७८७८० ०७९७३
ईमेल:
cppp-support@nic.in
उपयोगी दुवे
कृषी विभाग
भारतीय कृषी संशोधन परिषद
शासनाच्या सर्व विभागांशी संबंधित माहिती / सेवा / योजना इ. साठी *मुख्यमंत्री हेल्पलाईन* (टोल फ्री- १८०० १२० ८०४०) येथे २४*७ संपर्क साधावा.
केवळ कर्मचा-यांसाठी
ईमेल
लॉग इन
नोंदणीकृत कार्यालय कृषी उद्योग भवन, दिनकरराव देसाई मार्ग, आरे दुग्ध वसाहत, गोरेगाव (पूर्व), मुम्बई - ४०००६५ दूरध्वनी: ९१-२२-२४३००८२३ ईमेल: headoffice@maidcmumbai.com
कॉपीराइट © महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत, २०१७ सर्व हक्क स्वाधीन
संकेतस्थळाचे अंतिम अद्यतन:
०५-मे-२०२२
वस्तू व सेवा कर
संपर्क साधा
अस्वीकरण
अटी व शर्ती
मदत
या संकेतस्थळाचा 'विझोडिसी संगणकप्रणाली' यांनी विश्लेषण व रचना करून विकास केला. पत्ता: एकक ६२८ व ६२९, मास्टर माइंड ४, रॉयल पाम्स, गोरेगाव (पूर्व), मुम्बई - ४०००६५ भ्रमणध्वनी ९५९४२९८५५८; ईमेल: sales@wizodyssey.com