विभागीय कार्यालय, चंद्रपूरची स्थापना १९९३ मध्ये झाली. विभागीय कार्यालय, चंद्रपूरचे विभागीय कार्यालय वासाडे , जनता कॉलेज चौक, सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर येथे कार्यरत आहे. सदर विभागीय कार्यालय महामंडळाची दर्जेदार खते,कीटकनाशके,पशुखाद्य,कृषी उपकरणे/अवजारे आणि नोगा उत्पादने यांच्या विपणनामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. विभागीय कार्यालय, चंद्रपूरचे कार्यक्षेत्र गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्या पर्यंत पसरलेले असून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ांमध्ये अनुक्रमे एकूण ५.७४ लाख हेक्टर आणि 2.74 लाख विभागीय कार्यालय, चंद्रपूरची स्थापना १९९३ मध्ये झाली. विभागीय कार्यालय, चंद्रपूरचे विभागीय कार्यालय वासाडे , जनता कॉलेज चौक, सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर येथे कार्यरत आहे. सदर विभागीय कार्यालय महामंडळाची दर्जेदार खते,कीटकनाशके,पशुखाद्य,कृषी उपकरणे/अवजारे आणि नोगा उत्पादने यांच्या विपणनामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. विभागीय कार्यालय, चंद्रपूरचे कार्यक्षेत्र गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्या पर्यंत पसरलेले असून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ांमध्ये अनुक्रमे एकूण ५.७४ लाख हेक्टर आणि 2.74 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे व गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनुक्रमे 12 आणि 15 तालुक्यांचा समावेश होतो. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनुकमे 15 आणि 65 डीलर्सचे मजबूत डीलर नेटवर्क आहे. चंद्रपुरा जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, चना, गहू, तांदूळ आणि मिरची या प्रमुख पिकांची लागवड केली जाते आणि गडचिरोली जिल्ह्यात कापूस आणि भाताची लागवड केली जाते.