आमच्या कंपनीच्या उत्तम कामगिरीबद्दल सांगतांना मला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही, उत्पादकता तसेच आर्थीक अशा सर्वच मापदंडांवर चांगली कामगिरी केली आहे. मागच्या वर्षी मी म्हटले होते की मागील दोन वर्षांच्या घसरणीला अटकाव घालण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत आणि पुढे येणा−या वर्षांमध्ये आम्ही घेतलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसून येईल आमच्या कंपनीला नफा मिळविणारी सरकारी कंपनी बनविणे हा माझा प्रयत्न होता आणि मी अभिमानाने कथन करतो की आमच्या कंपनीने केवळ घसरणीला अटकाव घातला नाही तर आमच्या कंपनीवर घुटमळणा−या कृष्ण मेघांना दूर करून या वर्षी नफ्यातोट्याच्या खात्यात नफा दाखविला आहे. तथापी पुर्वीचा गौरव प्राप्त करण्यासाठी ब−याच आव्हानांना अजूनही सामोरं जायच आहे.
मजबूत आढावापत्रक, उच्च कार्यक्षमता, सुपरिभाषित कार्यप्रणाली, निष्ठावान व प्रतिबध्द कर्मचारी, वितरकांचे पसरलेले जाळे, आमच्या कंपनीचे आधारस्तंभ आहेत. अनेक चढउतारांना सामोरं जात आमची कंपनी अशी संघटना बनली आहे की जी एका छताखाली उच्च गुणवत्तेची सर्व कृषी आदानप्रदान १८०० वितरकांच्या जाळ्याव्दारे एकाच ब्रँडखाली करते. ब्रँड आहे 'कृषी उद्योग' ज्यावर शेतक−यांचा पूर्ण विश्वास आहे
महाराष्ट्राची कृषी प्रधान अर्थव्यवस्था नेहमीच हवामानावर अवलंबून राहिली आहे पण तरीही महाराष्ट्रीय शेतक−यांचा दृष्टीकोन पुरोगामी आहे. त्यांनी केवळ ज्ञानच मिळवले असे नसून ते अद्ययावत तंत्रज्ञानाशीही परिचीत आहेत, आणि त्यांची प्रबळ इच्छा आहे की अधिकाधीक उत्पादन शेतीतून घ्याव. या बदलत्या वातावरणाशी सामोर जाण्यासाठी आणि परंपरागत विक्रीच्या पुढे जाण्यासाठी आमच्या कंपनीने अनुकूल आणि कामगिरीशी निगडीत साधने व औजारे देण्याची योजना बनविली आहे. यामुळे आमची कंपनी बळकट झाली आहे.
मी आश्वासन देतो की कंपनी तिच्या सर्व प्रयासात शेतक−यांना नेहमीच प्राधान्य देईल व तिची भूमिका उगवत्या अनिर्बंध कृषी बाजारात, केन्द्रीत केलेले लक्ष जराही कमी न करता, वाढवेल. ज्या उद्देशाने महामंडळ १९६५ साली स्थापन झाले, त्या उद्देशाला आम्ही स्वतःला परत समर्पीत करत आहोत, याची देखिल मी हमी देतो. व्यवस्थापकीय संचालक, म. कृ. उ. वि. म. मर्या.