नोगा विभाग

उद्दिष्ट

नोगा उत्पादने तयार करण्यासाठी आवश्यक असणा-या शेतमालाची मोठ्या प्रमाणात भारतीय शेतक-यांन कडून खरेदी करून त्यांना मदत करणे तसेच सदर शेतमालावर प्रक्रिया करून व दर्जेदार उत्पादने योग्य किंमतीत ग्राहकांपर्यत पोहोचविणे. किरकोळ आणि इन्स्टिट्यूशनल सिग्मेंटद्वारे जसे कि, स्टार हॉटेल्स, सी.एस.डी, नौदल, भारतीय रेल्वे, एअर इंडिया, ग्राहक सहकारी संस्था इत्यादी द्वारे नोगा उत्पादनांचा प्रचार करणे.

पणन

नोगा उत्पादने गुणवत्तापूर्ण दर्जेदार असून त्यांना देशांतर्गत तसेच परदेशातील बाजारपेठांमध्ये खूप मागणी आहे. नोगा उतपादानांची विक्री किरकोळ बाजार, शासकीय संस्था येथे करण्यात येत असून त्याच बरोबर नोगा उतपादाने निर्यात (नेपाळ) करण्यात येतात.

वितरण / विक्री –
१. किरकोळ बाजार

नोगा उत्पादने किरकोळ बाजारात नागपूर व मुंबई डेपोमार्फत विक्री करण्यात येतात त्याचबरोबर सर्व विभागीय कार्यालयामार्फत राज्यात विक्री केली जातात. याखेरीज राज्याबाहेर C & F एजंट मार्फत नोगा उत्पादनांची विक्री करण्यात येते.

२.शासकीय संस्था

कॅन्टीन स्टोअर्स विभाग (CSD). इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC). एअरलाइन्स - इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया. हॉटेल्स - पंचतारांकित हॉटेल्स. सरकारी संस्था.

कामगिरी –

१. लखनऊ येथे झालेल्या ऑल इंडिया मॅंगो शो मध्ये मॅंगो जॅम व मॅंगो ज्यूस साठी प्रथम पारितोषिक प्राप्त. २. विजयवाडा येथे झालेल्या ऑल इंडिया मॅंगो शो मध्ये मॅंगो जॅमसाठी प्रथम पारितोषिक प्राप्त. ३. जर्मनीत ओरेंज मार्मालेड साठी लीपझीग पारितोषिक प्राप्त.

खतांचा व्यापार

क्रमांक आर्थिक वर्ष विक्री (MT) उलाढाल (रु. कोटी)
01 2015-16 2,33,077 506.92
02 2016-17 3,43,093 286.52
03 2017-18 240443 296.82
04 2018-19 178802 252.49
05 2019-20 218922 271.75

बफर स्टोरेज योजनेअंतर्गत वितरण

क्रमांक आर्थिक वर्ष युरिया (M.T) DAP(M.T)
01 2020-21 9096 --
02 2021-22 72242 --
03 2022- 23 62434 25231
04 2023- 24(राज्य सरकारने प्रस्तावित केलेले प्रमाण)(M.T) 100000 50000