खत विभाग

विभाग >उत्पादन

खत विभागाविषयी

खते विभाग "कृषीउद्योग" छाप्यामध्ये खतांचे उत्पादन व विपणन करत आहे.

  • सरकारी मानकांनुसार उत्पादित.
  • अमोनियाकल नायट्रोजन (NH3-N) च्या समावेशामुळे पिकांच्या वाढीदरम्यान पोषक तत्वे उपलब्ध होतात.
  • ते दाणेदार असल्याने, चूर्णाच्या तुलनेत कणके पाण्याने सहज वाहून जात नाहीत आणि वनस्पतीमध्येच राहतात.
  • कमी पावसात आणि बाहेरून पाणी देणे शक्य नसल्यास, त्याचे विघटन थांबते, त्यामुळे जास्त काळ टिकून राहते (दीर्घायुष्य)
  • ग्रेन्युलेशनसाठी रसायने वापरली जात नाहीत; त्यामुळे मातीची सुपीकता टिकून राहून खर्चात बचत होते.

कृषी उद्योग१८:१८:१०, कृषी उद्योग २०:२०:० व कृषी उद्योग २०.१०.१० या प्रमुख तीन खतांचे उत्पादन रसायनी,( जिल्हा रायगड) पाचोरा (जिल्हा जळगाव) नांदेड, वर्धा, कोल्हापूर व जालना येथील महामंडळाच्या मिश्रखत कारखान्यांमध्ये केले जाते. याव्यतिरिक्त विभागाद्वारे जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जिप्सम ई. खतांचा देखील राज्य सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुरवठा केला जातो .सन २०१५ पासून खते विभाग जैविक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते आणि अमोनियम सल्फेट या खतांची "कृषीउद्योग" छाप्यामध्ये खुल्या बाजारात विक्री करत आहे.

खत निर्मिती संयंत्रांची क्षमता

क्रमांक. स्थाने स्थापित क्षमता (MT) गुंतवणूक (रु. लाख)
1 रसायनी 60,000 339.42
2 पाचोरा 70,000 155.71
3 नांदेड 70,000 186.27
4 वर्धा 65,000 450.05
5 कोल्हापूर 30,000 161.08
6 जालना 30,000 282.68
Total 3,25,000 1,575.21

कृषी उद्योग खतांचे उत्पादन, विक्री आणि उलाढाल

क्रमांक आर्थिक वर्ष उत्पादन(MT) विक्री(MT) उलाढाल (रु. करोड)
01 2015-16 159151 152137 231.31
02 2016-17 150675 144958 217.31
03 2017-18 99865 133505 1897.70
04 2018-19 118191.350 110724 1812.90
05 2019-20 73055.650 79628 1502.80