MAIDC Mobile · fixed lang + refresh
🌿महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित 🌿

क्षेत्रभेट गॅलरी

शेतभेट कार्यक्रम

दिनांक: १६ मे २०२६

पत्ता: चिपळूण तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र

मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली “खत उपलब्धता व संनियंत्रण” विषयक राज्यस्तरीय बैठक संपन्न

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रमुख खत उत्पादने व पुरवठादार कंपन्यांच्या राज्य विपणन व्यवस्थापकांची “खत उपलब्धता व संनियंत्रण” या बाबत दि. 12/05/26 रोजी महामंडळाच्या गोरेगाव स्थित मुख्यालयात बैठक पार पडली.

सदर बैठकीस मे. इफको लि., मे. कृभको लि., मे. आय.पी.एल. लि., मे. पी.पी.एल. लि., मे. हिंदुस्तान उर्वरक लि., मे. जी.एस. एफ.सी. लि., मे. जी.एन.एफ.सी. लि, मे. हिन्डाल्को ली, मे.मोझॅक ली. इत्यादी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली:

➤ वेळेवर खत उपलब्धता सुनिश्चित करणे.
➤ वाढीव मागणीच्या काळात प्राधान्याने खत पुरवठा करणे.
➤ MAIDC व खत कंपन्यांमधील समन्वय अधिक बळकट करणे.
➤ खरीप हंगामात शेतकऱ्यांना अखंडित खत पुरवठा सुनिश्चित करणे.
➤ सेंद्रिय खतांच्या वापराबाबत MAIDC व खत उत्पादक/पुरवठादार कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार व प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करणे.
➤ युरिया खतांचा वापर नियंत्रित करण्यासाठी अन्य पर्यायी खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.

महामंडळाच्या आर्थिक वर्ष सन 25-26 मध्ये खते पुरवठ्याबाबतच्या योगदानाबाबत “धोरणात्मक पुरवठा” प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरवठादार मे. आर.सी.एफ. लि. यांना द्वितीय पुरवठादार मे. इफको लि. व मे. आय.पी.एल. यांना व तृतीय पुरवठादार मे. कोरमंडल इंटरनॅशनल लि. यांना प्रदान करण्यात आले.

मा. व्यवस्थापकीय संचालकांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

दिनांक १२ मे २०२६ रोजी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे यांनी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बोरगाव, उंबरडे आणि उरणोली येथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

या संवादादरम्यान व्यवस्थापकीय संचालकांनी मिश्र खते, कीटकनाशके, पशुखाद्य तसेच कृषी अवजारे यांसारख्या कृषी उद्योग उत्पादनांच्या उपलब्धता व गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून अभिप्राय जाणून घेतला. तसेच महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.

उपस्थित शेतकऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालकांचे मनःपूर्वक आभार मानून समाधान व्यक्त केले.

यावेळी उपमहाव्यवस्थापक श्री. देवानंद दुधाडे, विभागीय व्यवस्थापक श्री. नितीन जाधव, जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनील शेळवले तसेच गर्गी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री. मनोहर माळी उपस्थित होते.

मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी युरिया खत साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली

दिनांक १२ मे २०२६ रोजी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे यांनी संरक्षित खत साठा – खरीप २०२६ उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात साठविण्यात आलेल्या युरिया खत साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी खत साठा नोंदवहीची तपासणी करून वितरकांकडून खतांची सध्याची मागणी व पुरवठा परिस्थितीची माहिती घेतली.

या भेटीदरम्यान उपमहाव्यवस्थापक श्री. देवानंद दुताडे, विभागीय व्यवस्थापक श्री. नितीन जाधव, जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनील शेळवले,

तसेच गर्गी कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री. मनोहर माळी व श्री. प्रशांत माळी उपस्थित होते.